
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव च्या सर्व कर्जदार सभासदांच्या खात्यात पीक कर्ज रक्कम जमा करण्यात आली असून,याची नोंद सर्व कर्जदार सभासदांनी घ्यावी असे आवाहन अध्यक्ष जानराव भाऊ वामनराव गीरी यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे केलं आहे .
दोन कोटी चाळीस लाख चाळीस हजार नवशे रुपये कर्जदार सभासदांच्या खात्यात पीक कर्ज जमा झाले आहे. पन्नास हजार रुपये मिळणारी सानुग्रह अनुदान रक्कम सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ती रक्कम लवकरच सभासदांच्या खात्यात जमा होईल असे सांगीतले व पीक कर्जाची रक्कम २७ मे २०२२ पासून आपल्या खात्यातून कर्जदार सभासद काढू शकतात असे अध्यक्ष जानराव भाऊ गीरी यांनी सांगितले आहे.
