
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून दिं १९ मे २०२२ रोज गुरुवारला चिखली येथील पारधी बेड्यातील लोकांना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यवतमाळ आदिवासीबहुल जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील कोलाम पोड,तांडा वस्ती, पारधी बेडा,येथे जात प्रमाणपत्र तसेच महत्त्वाचे दस्तऐवज वाटप करण्यात आले असून दि १९ मे २०२२ रोजी महसूल विभागाच्या पुढाकाराने चिखली येथील पारधी बेढ्यातील ५३ लोकांना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले असून यावेळी जात प्रमाणपत्राचे वाटप करताना उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार रवींद्र कानडजे तसेच निवासी नायब तहसीलदार दिलीप बदकी यांच्या मार्गदर्शनाखाली जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित मंडळ अधिकारी (धानोरा ) शिशीर निनावे, तलाठी वृषाली भोयर,सरपंच नलू ताई वैरागडे, पोलीस पाटील कांचनताई घायवटे व ग्रामपंचायत चे सर्व सदस्य तसेच धानोरा येथील तलाठी ग्रामपंचायत कर्मचारी व कोतवाल व गावातील पुरुष महिला या वेळी उपस्थित होते.
