
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील खैरी येथे सुरेश गुलाबराव मत्ते यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या घरी जाऊन त्यांची पत्नी माधरी सुरेश मत्ते व विजय पुडलींकराव बरटकर यांनी पण आत्महत्या केली होती.त्यांच्या पण घरी जाऊन त्यांच्या पत्नीला ऐक लाख रूपये शासनाकडून मंजुर करुन झाले होते त्यापैकी त्यांना २९५०० रुपयाचे चेकचे वाटप केले व ७०५०० रुपयाचे चेक पोस्ट मध्ये एफ डी करवुन घेण्याकरिता त्यांनी सांगितले. या प्रसंगी तहसीलदार डॉ.कानडजे, नायब तहसीलदार काळे, खैरी येथील तलाठी पाटील तलाठी चिडे कृषि सेवक मुळाटे, खैरी येथील उपसरपंच श्रीकांत राऊत ग्रा.प सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रविद्रभाऊ निवल येथील तलाठी तंटामुक्तीचे अध्यक्ष किशोरभाऊ सोनवणे उपस्थीत होते.
