शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप त्वरीत करावे:- आमदार प्रा डॉ अशोक उईके यांची मुख्यमंत्र्या कडे मागणी

राळेगांव (तालुका प्रतिनिधी):रामभाऊ भोयर

कोव्हिड -19 च्या संसर्गामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे .याचा परीणाम सर्वच क्षेत्रावर झाला आहे .यातून कृषी क्षेत्र ही सुटले नाही यवतमाळ जिल्ह्यात शेतीवर उपजीविका असणाऱ्यांची संख्या मोठी आहे . यातच शेतकरी आत्महत्या हा गंभीर विषय जिल्ह्याचा आहे राळेगाव मतदार संघात सिंचनाची शेती करणाऱ्यांपेक्षा कोरडवाहू शेतकरी जास्ती आहे राळेगाव तालुक्यात मागील वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे व डुप्लिकेट बीटी बियाणे,सोयाबीनवर आलेली खोड अळी या मुळे उत्पन्न फारसे समाधानकारक झाले नाही तालुक्यातील शेतकरीवर्ग बँकेचे कर्ज घेऊन शेती करतो दरवर्षी त्या कर्जाचा भरणा करण्याचा प्रयत्नही करणारे शेतकरी आहेत शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करणे पुढील हंगामाकरिता सुरू केली आहे शेतीसाठी लागणारे अर्थसाह्य कर्जाच्या स्वरूपात मिळविण्याकरिता बँकेच्या कार्यालयात शेतकरी चकरा मारीत आहे तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप त्वरित करावे अशी मागणी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे शेतकरी पीक कर्जाच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात उपविभागीय अधिकारी , तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी ,तालुका ऐ आर यांची बैठक बोलविण्यात आली होती. या वेळेस तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी नियमित कर्ज परतफेड केले परंतु त्यांना पुन्हा कर्ज मिळाले नाही तीन-चार महिने आधी त्या शेतकऱ्यांचे थंब ऑटोटीकेशन होऊन ही कर्ज माफी चे पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांना कर्जाच्या संदर्भात अनेक अडचणी येत असल्याने व बँकेचे अधिकारी त्यांच्या अडचणी समजून घेत नसल्याने कर्ज पुरवठा होत नाही यामुळे सामान्य शेतकऱ्यात अनास्था आली आहे आपण तालुक्यातील सर्वच बँकांचा कर्ज पुरवठ्या संबंधी आढावा घ्यावा तलाठी वर्गाकडून व कृषी सहाय्यका कडून गाव पातळीवरील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन याअडचणीच्या काळात पोशिंद्या ला न्याय देण्याचं काम आपण अधिकारी वर्गाने कराव .अशा सूचना यावेळेस देण्यात आल्या. तसेच शासनस्तरावरून या संदर्भात कुठले आदेश आहे याचीही माहिती घ्यावी. या वेळेस आमदार उईके यांनी शेतकऱ्यांना त्वरित पिक कर्ज मिळावे,बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यावर कठोर कारवाई करावी कारण या मुळे दुबार पेरणी करावी लागत असूनपुन्हा बियाण्याचा खर्च वाढतो व शेतकरी आत्महत्या वाढतात कारण तो आर्थिक ताण सहन करू शकत नाही . यासाठी मुख्यमंत्र्यांना आपण या सर्वच प्रश्नाकडे लक्ष देणे संदर्भात विनंती करनार आहो.शेतकऱ्याच्या संबंधित सर्वच प्रश्नांच्या संदर्भात आपण पावले उचलावी अशा सूचना राळेगाव मतदार संघाचे आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी केली आहे या वेळेस .आढावा बैठकीला आमदार प्रा डॉ अशोक उईके , उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार रवींद्रकुमार कानडजे,तालुका कृषी अधिकारी कु मनीषा गवळी, तालुका ऐ आर पंचायत समिती सभापती प्रशांत तायडे,भाजपा शहर अध्यक्ष डॉ कुणाल भोयर उपस्थित होते. तालुका प्रतिनिधी राळेगाव. रामु भोयर