
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर मध्यम प्रकल्प या वर्षी तुडुंब भरला असून उर्वरित पाण्याचा विसर्ग नाल्यात सोडला असून तो विसर्ग नाल्याच्या खोली व रुंदीच्या क्षमतेपेक्षा जास्त असल्याने या विसर्गाच्या पाण्याने गावकऱ्यांची झोप उडवली असून उर्वरित पाणी नाल्यातून बाहेर फेकून तांड्यात, गावात बऱ्याच लोकांच्या घरात पाणी घुसले असून या बाबत वृत्तपत्रात सध्याच बातम्या प्रकाशित केल्या असूनअनेक लोकांच्या दैनंदिन जिवनावश्क वस्तू, वापराचे भांडे, रासायनिक खते अशा अनेक गोष्टीचे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले,अनेकांची घरे पडली असून या सर्व गोष्टीला, झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीला मध्यम प्रकल्प जबाबदार असून या झालेल्या नुकसानीची पाहणी काॅंग्रेस पक्षाचे नेते तथा माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके सर यांनी वरूडला दिनांक 18/7/2022 रोजी भेट देऊन पाहणी करून शासनाकडे पाठपुरावा करून आपणास मदतीसाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले याच भेटी दरम्यान श्रीमती गिरजा ऊईके यांच्या परिवारातील दोन सदस्य मरण पावले व शेषराव उईके यांची मुलगी मरण पावली त्यामुळे दोन्ही परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले त्यावेळी या दौऱ्यात सरांसोबत काॅंग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर, वसंत जिनिंगचे उपाध्यक्ष अंकुश रोहणकर,पिंपळगावचे सरपंच किशोर धामंदे,विजय मानेकर, खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावनसिंग वडते सर, वसंत जिनिंगचे संचालक रामधन राठोड, जेष्ठ कार्यकर्ते सदानंद भोरे,माजी शाळा व्यवस्थापन समिती सभापती किरण निमट, ग्रामपंचायत सदस्य भानुदास चव्हाण सह ईतर गावकरी उपस्थित होते.त्यावेळी प्रा.पुरके सर यांनी मध्यम प्रकल्पाच्या जबाबदार अधिकाऱ्यांशी होणाऱ्या शिल्लक विसर्गावर उपाय करण्यासाठी चर्चा करणार असून या विसर्गाचा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
