
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील अंतरगात सावंगी ग्राम विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी मानकर गटाचे महादेवराव नेहारे तर उपाध्यक्ष पदी राहुल ढूमने यांची निवड करण्यात आली.सदर अंतरंगात सावंगी ग्राम विकास सहकार सोसायटीच्या निवडणुकीत मानकर गटाचे राजू ओंकार यांच्या पुढाकाराने १३ पैकी ८ जागेवर विजयी मिळवता आला तर विरोधी गटाने ५ जागेवर विजयी मिळवला आहे. तर मानकर गटाचे विजयी उमेदवार महादेवराव नेहारे अध्यक्ष तर उपाध्यक्ष राहुल ढूमने तर सदस्य गणेशराव बातुलवार, सचिन शेंडे, अभिजित बूरले, अनिलराव दांडेकर तर सौ.वर्षाताई ओंकार,सौ.संगिता जयस्वाल हे निवडणुकीत विजयी झाले आहेत तर विरोधी गटाचे विजयी उमेदवार विजय बूरले,अभिलाष उमरे , सुनील जिंडेवार , महेश गोविंदवार, सुनील कवडे हे निवडणुकीत विजयी झाले आहे.सदर वरील सर्व उमेदवारांना सहकार क्षेत्राचे नेते तथा यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्लभाऊ मानकर व राजुभाऊ ओंकार यांनी पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
