
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर(9529256225)
राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवशंभु क्रिकेट क्लब धानोरा येथे आयोजित भव्य खन्ना बाॅल क्रिकेट चे ग्रामीण सामन्याचे उद्घाटन समारंभ दि.१९-०२-२०२२ रोजी माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंतरावजी पुरके, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव ॲड प्रफूल्लभाऊ मानकर,शहर अध्यक्ष भाजपा राळेगाव डॉ.कुणालभाऊ भोयर , डॉ.शामसुंदरजी गलाट, माजी पंचायत समिती उपसभापती शामकांतभाऊ येनोरकर,सरपंच दिक्षाताई मुन,उपसरपंच विशालजी येनोरकर ,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व सरपंच रावेरी राजुभाऊ तेलंगे , खरेदी विक्री संघाचे संघचालक अशोकराव काचोळे,रामुजी भोयर, विजयभाऊ येनोरकर, विलासराव घिनमिने, सरपंच ग्रा.पं चिखली अभयजी पुडके, खरेदी-विक्री संघाचे संचालक पंकज भाऊ गांवडे, रामचंद्रजी पोटभरे, चंदुभाऊ कामडी, यांच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते व माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंतरावजी पुरके ,सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव ॲड प्रफूल्लभाऊ मानकर,शहर अध्यक्ष भाजपा राळेगाव डॉ.कुणालभाऊ भोयर, यांनी खेळाडू ना मोलाचे मार्गदर्शन केले व क्रिकेट खेळाबद्दल माहिती सांगितली व या गावातून आंतरराष्ट्रीय खेळ्यात सहभागी होऊन गावाची मान उंचावर न्यावी अशी शुभेच्छा पण दिल्या.
व या सामन्यांना यशस्वी करण्यासाठी गौरव गलाट,अक्षय घोडे ,स्वप्नील भोयर ,मयुर उराडे,प्रणय मुडे,जिवन पुणेकर,मनोज नेहारे,विशाल घोडे,प्रविण गलाट, आकाश वाकडे ,साहील कांबळे ,किरण कामडी,गणेश किन्नाके, ऋषीकेश फटींग व मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.
