
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव शहराला लागून असलेल्या एका शेतातून झटका मशीन व व दुसऱ्या शेतातून इतर साहित्य चोरीला गेले त्यामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत शहराला लागून असलेल्या तेजेश्वर मेंडोले यांच्या शेतातील झटका मशीन तसेच सोलर पॅनल व बॅटरी तसेच त्यालाच लागून असलेल्या नामदेवराव काळे यांच्या शेतातील कटर मशीन पंपाच्या बॅटऱ्या व इतरही साहित्य चोरीला गेलेले आहेत सद्यस्थितीत रब्बी हंगाम सुरू आहेत शेतात चण्याचे पीक घेतले आहेत चण्याच्या पिकाला वन्य प्राण्यांचा धोका लक्षात घेता सुरक्षिततेसाठी म्हणून तसेच इतरही पिकाच्या व्यवस्थापनासाठी शेतकरी शेतात झटका मशीन लावतात पण आता ह्याच मशीन जर चोरी जात असेल तर शेतकऱ्यासमोर प्रश्न निर्माण होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत या चोरांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलीस विभागासमोर आहेत ऐन हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्याने पुन्हा झटका मशीन घेणे व त्यासाठी खर्च करणे हे दिव्य आता शेतकऱ्याला पार पाडावे लागेल
