कृषी मंत्री अब्दुल्ल सत्तार यांची झाडगाव येथे धावती भेट,महिना लोटला तरी शेतकऱ्याला रुपयाची मदत नाही

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते मात्र त्यांचा नियोजित दौरा त्यांनी बदल करून आज आच्यानक भेट देऊन पूरग्रस्त भागात त्यांनी पाहणी केली
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील पुराने खरडून गेलेल्या शेताची त्यांनी पाहणी केली. नाल्या लगत संरक्षण भिंत बांधण्याचे आस्वासन त्यांनी दिले.आ. प्रा. डॉ. अशोक उईके यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त परिस्थितीबाबत कृषी मंत्र्यांना अवगत केले. या वेळी तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे तसेच राळेगाव गट विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्यासह अनेक व्यक्ती आणि गावकरी आणि पूरबाधित भागातील शेतकरी उपस्थित होते.

या वर्षी शेतकऱ्यांनी कर्ज काढून, उसनेपासने करून घेतलेली पिके महापुरात जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. पुरातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले. त्यानुसार पंचनामे करण्यात आले. त्यानंतर लवकरच भरपाई मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, दीड महिने उलटूनही शेतकऱ्यांना आतापर्यंत दमडीची मदत मिळालेली नाही. असा आरोप शेतकरी राजू लटारे यांनी केला आहे.