
राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)
अंतरगाव येथील वृक्षप्रेमी त्रिमूर्तीं बाबाराव कोडापे, वाल्मिक नागपुरे व दशरथ वनारसे यांनी अंतरगाव येथे गेल्या पंधरा वर्षांपासून वड, पिंपळ, जांभूळ,कंरजी,बेल व कडूनिंब या प्रकारचे विविध वृक्ष लागवड करुन त्यांची जोपासना केली व पुर्ण परिसर हिरवागार गेला..
बाबाराव कोडापे स्वतः पाच वाजता उठून विहिरींचे पाणी बादली ने काढून झाडांना पाणी देणे व झाडं मोठे झाली की त्याला सिमेंट ओठा बनविने व त्यांचे संवर्धन करणे,या वेळी कोणी झाडाला हात जरी लावला तर त्याची कानउघाडणी करणे…असा हा वृक्षप्रेमी बाबाराव..
