
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची व पशु पर्यवेक्षकांची अनेक पदे मागील काही वर्षापासून रिक्त आहेत त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन वरील उपचार शिपायाच्या भरोशावर चालत असून पशूंची आरोग्यसेवा धोक्यात आली आहे.
राळेगाव तालुक्यात एकूण श्रेणी-१ चे दवाखाने राळेगाव, वरध, वडकी, असे तीन व उर्वरित वाढोना बाजार, झाडगाव, जळका, धानोरा, देवधरी, खैरी अशा सहा ठिकाणी वैद्यकीय दवाखाने आहेत .
मात्र श्रेणी-१ च्या दवाखान्यामध्ये राळेगाव पशुधन विकास अधिकारी आहेत मात्र वडकी वरध येथे एल एस एस ची पद रिक्त आहेत तर वाढोनाबाजार झाडगाव जळका धानोरा देवधरी अशा पाच व पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक नसून फक्त खैरे येथे एकच पशुधन पर्यवेक्षक कार्यरत आहेत तर वडकी वरध देते श्रेणी-१ दवाखान्यात एल एस एस ची दोन कर्मचारी कार्यरत आहे परंतु त्यांना इतर ठिकाणचा प्रभार असल्यामुळे पशुधनावर उपचार करण्यास असल्याने असमर्थ ठरत आहे.
शेती क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढले असले तरी अनेक शेतकऱ्यांकडे बैलजोडी तसेच बहुतांश शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात त्यांच्याकडे पाळीव जनावरे आहेत या जनावरांना आजार झाल्यास त्यांना पशु दवाखान्यात न्यावे लागते मात्र दवाखान्यात तज्ञ डॉक्टर नसल्याने त्यांच्यावर पाहिजे तसे उपचार होत नसल्याने जनावरे दगावली जातात तालुक्यात एकूण श्रेनी १ चे तीन दवाखाने असून व इतर सहा पशुवैद्यकीय दवाखाने असून तीन दवाखाने वगळता इतर दवाखान्यातील कारभार केवळ शिपायावर चालू असून पशुपालकांना आपले पशुधन खासगी डॉक्टरांकडे न्यावे लागत आहे त्यामुळे शासनाने पशुधन अधिकारी पशुधन पर्यवेक्षक यांची पदे तातडीने भरावीत अशी मागणी तालुक्यातील पशुपालकांनी केली आहे.
