
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडाखुर्द येथील राष्ट्रमाता विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय यांच्या ईयत्ता दहावी आणि बारावी यांच्या निकालाची परंपरा यंदाही कायम आहे. मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या नागपुर बोर्डाच्या 12 वि च्या परिक्षेत शाळेतुन प्रथम – रणजीत संजय आत्राम 69.17% , द्वितीय रुतुजा गुरुदास जुवारे 68.50% तर तृतीय क्रमांक लक्ष्मी संजय देऊरमल्ले 66.17% या विद्यार्थांनी पटकावला आहे. त्याचप्रमाणे ईयत्ता 10 वी मध्ये प्रथम पवन विनोद घिवे 84.20% , द्वितीय क्रमांक सानिया जितेंद्र टिकले 84% तर तृतीय क्रमांक वैष्णवी निलेश कुनघाडकर 83.60 यांनी प्राप्त केला आहे. प्राविण्य प्राप्त विद्यार्यांचे राष्ट्रमाता ग्रामिण विकास शिक्षण प्रसारक मंडळ देवाडाखुर्द चे अध्यक्ष मुर्लीधरराव नागुलवार ,सचिव शंकरराव टिकले तथा सर्व संचालक मंडळ ,प्राचार्य बि.आर.मेश्राम तथा सर्व प्राध्यापक ,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
