
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
ग्राम स्वराज्याची ग्राम संवाद यात्रा आज जळका येथे जाऊन पोहली तेव्हा ग्रामस्थांनी “ग्राम संवाद यात्रेत” आवडीने आपला सहभाग घेतला होता अशी यात्रा गावा गावात आली पाहिजे अशी भावना जळका येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे
ग्राम संवाद यात्रा चे मुख्य संयोजक मा.मधुसुदनजी कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी गावातील लोकांना मार्गदर्शन करताना सांगितले की गावातील लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी ग्रामसभा हे सर्वात मोठे चर्चा करण्यासाठी व्यासपीठ आहे म्हणून लोक प्रतिनिधी नी गावात जाऊन ग्रामसभा घेतली पाहिजे आणि लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजेत
गावात जाऊन गावातील समस्या ऐकून घेताना लोक प्रतिनिधी गावा पासून कोसो दूर आहे असे दिसून आले आहे लोकांनी समस्याचा पाढा वाचत १) आमचं घरकुल कधी बांधुन देनार २) पांदन रस्त्यांची दुरवस्था ३) बोंड अळीची शेतकऱ्यांना भिती ४) सरकारी योजना ची कोणी ही माहिती देतं नाही ५) गावात ग्रामसभा घेतली जात नाही अशा अनेक समस्या ची यादी लोकांनी वाचन केली आहे
ग्राम संवाद यात्रेत सामील झालेले लोक चर्चा करण्यासाठी उत्सुक होते आज ही यात्रा जळका,वर्णा कृष्णपुर या गावात जाऊन लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत या यात्रेत सहभागी मा.मधुसुदनजी कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच रमेशराव खन्नी, दत्ताजी मरस्कोले, नितीनजी ठाकरे, गणेशजी विलारी, कुंडलीकजी देवतळे, दशरथजी आंजीकर, कैलासजी वाघमारे, ग्राम पंचायत सदस्य नागापुरे आणि समस्त गावकरी उपस्थित होते.
