राळेगाव तहसील कार्यालयासमोर ग्रामरोजगार सेवकांचे प्रमुख मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती तालुका राळेगाव जि.यवतमाळ यांचे शासकीय सेवेत ग्राम रोजगार सेवकांना समाविष्ट करणे या प्रमुख व एकमेव मागणीसाठी आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त दिनांक ०२/१०/२०२१ रोजी एकदिवसीय लक्षणिक उपोषण सुरू आहे यावेळी प्रभुदास बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली व रोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष मयुरजी जुमळे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे तसेच उपाध्यक्ष प्रितमजी इंगोले,निलेशजी भगत,प्रविणजी खेवले,विवेकजी उंडे,नितेशजी तिवाडे,व तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक उपस्थित आहे