
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव – ट्रायबल फोरम शाखा दहेगावच्या अध्यक्षपदी अजय जुमनाके तर महासचिवपदी सुरज सलाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड ट्रायबल फोरम महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष अँड. प्रमोद घोडाम व जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल कोवे यांच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष शंकर पंधरे यांनी निवड केली आहे. तसेच उर्वरित कार्यकारिणीही गठित केली आहे. यात उपाध्यक्ष सागर मेश्राम, कार्याध्यक्ष दिलीप परचाके,कोषाध्यक्ष सतीश सोयाम,सचिव राजेंद्र जुमनाके, संघटक आकाश परचाके ,प्रसिद्धी प्रमुख नितेश पेदोंर ,सदस्य मोहन पवार,मंगेश कुळसंगे यांची निवड करण्यात आली तसेच त्यावेळी तालुका उपाध्यक्ष सुनील मेश्राम सदस्य रुषीनाथ मडावी उपस्थित होते. तसेच सर्व निर्वाचित टिमने आपल्या निवडीचे श्रेय ट्रायबल फोरम महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष अँड. प्रमोद घोडाम, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल कोवे ,तालुका अध्यक्ष शंकर पंधरे, महासचिव स़ंजीव मडावी , तालुका उपाध्यक्ष सुनील मेश्राम यांना दिले.
