वडकी पोलिसांची वरध शेत शिवारात कोंबड बाजारावर धाड ,१ लाख ७१ हजाराच्या मुद्देमालासह ५ आरोपींना अटक, ८ आरोपी फरार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

     

राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरध शेत शिवारात कोंबड बाजारावर वडकी पोलिसांची धाड सविस्तर वृत्त असे गोपनीय माहिती नुसार वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांनी ५ डिसेंबर रोजी गोपनीय बातमीदार यांचे कडून खात्रीलायक माहिती प्राप्त झाली की ग्राम.वरध शेत शिवारातील तलावा जवळील मोकळ्या जागेत (१) विठ्ठल दमडु पवार वय ४५ वर्ष ,(२)संतोष अमृत जुनगरे वय ३० वर्ष,(३) ज्ञानेश्वर कवडु सोनवणे वय ४० वर्ष सर्व रा.ग्राम वरध यांनी मिळुन काही इसमांना वरध शिवारातील तलावाजवळ एकत्र जमवून कोंबड बाजार नावाचा जुगार खेळत आहे अशा खबरे वरुन त्यांच्या वर रेड करण्याकरिता पोलीस उप निरिक्षक मंगेश भोंगाडे यांच्या अधिपत्याखाली पोलीस पथक तयार करून वरध येथे रवाना केले सदर पथकाने वरध शिवारात जावून पाहणी करून खात्री केली असता त्यांना सदर ठीकाणी कोंबड बाजार सुरु असलेला दिसला वरुन सदर पथकाने कोंबड बाजारावर रेड केली असता कोंबड्यांच्या झुंजीवर पैशाची बाजी लावणारे (१) संजय अजाबराव मुंगसे वय ४० वर्ष रा.सावनेर,(२) गनेश पुरुषोत्तम शेळके वय ३५ वर्ष रा.सावरखेडा,(३) मोरेश्वर छित्रुजी उरकुडे वय ५५ वर्ष रा.सावरखेडा,(४) सुभाष विठ्ठल दडांजे वय २९ वर्ष रा.खेंमकुंड,(५) हरीष मनोहर लांबट वय २३ वर्ष रा.सावनेर असे रंगे हात मिळुन आले.नमूद इसमाजवळ एकुण ३२००से रुपये नगदी तसेच दोन मोबाईल किंमत६००० हजार रुपये तसेच एक मोटारसायकल MH29 BK 0687 किंमत४०००० हजार रुपये असा एकुण ४९,२००रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला. तसेच घटनास्थळावर पाच कोंबडे किंमत अंदाजे २००० हजार रुपये व थोडे अंतरावर ४ मोटारसायकल (१) MH29Z8571 किंमत ४०००० हजार रुपये,(२) MH32D8581 किंमत ४०००० हजार रुपये,(३) बजाज CT100 किंमत ४०००० हजार रुपये मिळुन आल्या असून सर्व नमूद आरोपीत इसम व घंटनास्थळावर ऐकून १,७१२२० /रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला आहे.तसेच घंटनास्थळावर फरार कोंबड बाजार भरविणारे आरोपीत इसम विठ्ठल कवडु पवार,संतोष अमृत जुनगरे,ज्ञानेश्वर कवडु सोनवणे,सर्व रा.वरध तसेच फरार व कोंबड बाजारामध्ये कोंबड्यावर पैशाची बाजी लावणारे अमोल बजरंग जिड्डेवार वय ३० वर्ष ,पवन विठ्ठलराव गोपतवार वय ३५ वर्ष दोन्ही रा.वरध तसेच घंटनास्थळावरुन कोंबड बाजार जुगार खेळणारे असे सर्व आरोपीत इसम हे फरार झाले आहेत नमूद सर्व आरोपीत इसमा विरुद्ध कलम १२(ब) महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.सदरची कामगिरी दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ, डॉ.खंडेराव धरण अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ,प्रदिप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन वडकीचे ठाणेदार विनायक जाधव,पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोंगाडे,पो.हे.का.रमेश आत्राम,गजानन अडपावार, ना.पो.कॉ. विकास धडसे,रमेश मेश्राम, पो.कॉ संदीप मडावी, अमरदीप पेचे,समीर कुमरे, भुषण महाजन यांनी पार पाडली आहे.