
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
चहांद स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव योजने अंतर्गत आदर्श गाव चहांद येथे दिनांक ०६ ऑगष्ट २०२२ रोजी जिल्हा परीषद प्राथमिक शाळेमध्ये भव्य आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजीत करण्यात आले होते. गरोदर माता सौ आश्विनी राउत, रूपाली केराम, भाविका परचाके यांचे हस्ते प्रतिमापूजन झाले. शिबीराचे उद्घाटन मा. रूपाली राउत सरपंच, ग्रामपंचायत चहांद यांचे शुभहस्ते झाले, कार्यक्रमाला उपसरपंच मा. कविता चांदेकर, ग्रा.पं. सदस्य श्री शेळके, श्री. येडे, श्रीमती कांबळे, शाळा समिती अध्यक्ष श्री. मोहन चांदेकर, मुख्याध्यापिका मा. जगताप मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोपाल पाटील यांचे मार्गदर्शनात व प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगांव येथील वैद्यकिय अधिकारी डॉ ज्योती निकम, डॉ आशिष बरगट यांचे नियोजनात भव्य आरोग्य तपासणी व उपचार शिबीर घेण्यात आले. शिबीरामध्ये डॉ. ज्योती निकम यांनी गरोदर मातांच्या संपूर्ण तपासण्या व उपचार करून योग्य मार्गदर्शन केले. तसेच ते ५ वर्षातील एकूण तपासणी केलेली बालकांची तपासणी, किशोरवयीन मुलींची तपासणी, डोळे तपासणी, असंसर्गजन्य आजार अंतर्गत रूग्ण तपासणी, रक्तदाब, मधुमेह, मोतीबिंदू, क्षयरोग, कुष्ठरोग, हायड्रोसील, मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भशयमुख कर्करोग तपासण्यासह सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या व उपचार करण्यात आले. संदर्भसेवेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. साथरोगाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत आरोग्यशिक्षण देण्यात आले. आरोग्य शिबीराला आरोग्य सहायक अनंत सावळे, आरोग्यसेविका सुनिता शेंडे, लता खापर्डे, मंगला मांढरे, आरोग्यसेवक खेमराज रामटेके, निलेश बोदलकर, बबन क्षिरसागर, शेषराव बोरपे, समुदाय आरोग्य अधिकारी मयुरी घोडे, वैष्णवी आष्टनकर, डिंपल जवादे, रेवती साटोने, करीष्मा नरडे, सोनम बेलूरकर, औषध निर्मान अधिकारी विशाल सावरकर, गटप्रवर्तक योगेश्री मुंडे, वनिता चौधरी, आश्विनी वाढई, आशा प्रभावती चांदेकर, मंदा रोठे, कल्पना पेंदोर, वर्षा आत्राम, नितीन मोहीतकर, चेतन हरणे, ग्रामिण रूग्णालय राळेगांव येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीकांत लाभसेटवार, नेत्रतज्ञ श्री. उपरे, समुपदेशक वर्षा बडनखे यांचेसह चहाद ग्रामस्थांच्या सहकार्याने आरोग्य शिबीर यशस्वीपणे पार पडले.
