
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येथे मानवाधिकार इमरजेंसी हेल्प लाइन असोसिएशन, कार्यकारणीची सभा दिनाक 6 नोव्हेंबर शनिवार ला सकाळी ठिक 11:00 वाजता स्थानिक विश्रामगृह येथे संपन्न झाली यावेळी साहेबराव राठोड राज्य सचिव (महाराष्ट्र प्रदेश) अंबादास जाधव अध्यक्ष अमरावती विभाग मा. रौराळे सर अध्यक्ष विदर्भ. मा. डॉ नितीन पडोळे , मा. जयकुमार गवई सर , मा. अविनाश पवार अध्यक्ष यवतमाळ, मनोज चांडक जिल्हा, मा. सागर गवई अध्यक्ष अमरावती जिल्हा मा. अक्षय बांते महासचिव अमरावती हे यावेळी उपस्थितीत होते, तसेच यावेळी यवतमाळ जिल्हा संदर्भात मानवधिकार कायदे व तक्रारी संदर्भात चर्चासत्रचे आयोजन केले या कार्यक्रमाचे संचालन विनोद चिरडे यांनी केले .तसेच यावेळी राळेगाव मानवाधिकार इमरजेंसी हेल्प लाइन असोशिएशनचे तालुका अध्यक्ष डॉ. बी. एम. कोकरे, उपाध्यक्ष सूचित बेहरे, सचिव विनोद चिरडे सदस्य हनुमान राडे, माधुरी खडसे, अविनाश राडे, गजानन खंडाळकर हे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तर कार्यक्रमा चे आभार प्रदर्शन सूचित बेहरे यांनी केले.
