

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव शहरातील भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मीर येथे कार्यरत असलेले नीलेश हजारे यांनी शहीद भगतसिंग यांच्या पाच हजार प्रतिमा भेट देणाचा निर्धार केला आहे व या कार्याला त्यांनी सुरवात सुध्दा केली आहे. ते सद्या रजेवर असल्याने त्यांना या कार्याला राळेगाव येथे सुरवात केली आहे. त्यांनी आजवर अनेक शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमा भेट दिल्या आहेत लग्न, वाढदिवस व विवीध कार्यक्रमाला त्यांनी भेट देऊन शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमा भेट दिल्या आहेत व त्यांनी शहीद भगतसिंग यांच्या पाच हजार प्रतिमा भेट देण्याच्या निर्धार केला आहे त्यांच्या या कार्याला तालुक्यांतील युवकांनी व जनतेनी सलाम केला आहे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
