स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षाच्या कालावधी नंतर ही बहुतांश गावामध्ये स्मशानभूमी चं नाही???

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

भारत देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्षाच्या वर कालावधी उलटला पण राळेगांव तालुक्यातील साठ टक्के गावा मध्ये स्मशानभूमीचं नाही. त्यात प्रामुख्याने वडकीची परीस्थिती अतीशय ग़भीर आहे.तिन्ही ऋतू मध्ये अंतीम संस्कार करताना गावकऱ्यांना जिवंत पणीच नरकयातना भोगाव्या लागत आहे. 
राळेगांव तालुकयामध्ये त्र्याहत्तर ग्रामपंचायती आहे. जवळपास उजाड गावं पकडून एकशे चौदा गावे येतात. साठ गावामध्ये आजमितीस स्मशानभूमी चं नाही तर जिथे होती ती आता जिर्णावस्थेत असून याचा काहीच उपयोग नाही. प्रेताचा अंत्यसंस्कार विशेषतः पावसाळ्यात खूपच त्रास सहन करावा लागतो.तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वडकी या गावात तर स्मशानभूमीच नाहीत येथील नागरिकांना दोन किलो मीटर अंतरावरील लगतच्या बोरी ईचोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे लागते.राळेगांव तालुक्यामध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जिल्हाच्या,राज्य सरकार मध्ये प्रतिनिधित्व केले आहे. दोन कॅबिनेट मंत्री मिळाले. राज्य सरकारमध्ये महत्त्वाची खाती आजी माजी आमदारांनी सांभाळली.पण स्मशानभूमी प्रत्येक गावात झालीच पाहिजे असे प्रयत्न मात्र सबंधितां कडून झालेच नाही. या मध्ये पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य यांचे ही प्रयत्न तोकडे पडत आहे. त्यामुळे च शंभर टक्के म्हणा की गाव तिथे स्मशानभूमी ही पुर्णत्वा कडे गेलीच नाही. उन्हाळ्यात भर ऊन्हात,पावसाळ्यात भर पावसात,हिवाळ्यात भर थंडीत,आपल्या आप्तस्वकीयांचे अंत्यसंस्कार खूप त्रास सहन करत फक्त स्मशानभूमी व इतरांना सावली साठी निवारा नसल्याने सोसावा लागत आहे.