प्रतिनिधी:सुमित चाटाळे
यवतमाळ : झरी तालुक्यातील पिवरडोल शेतशिवारात शौचास गेलेल्या एका तरुणावर वाघाने हल्ला करून त्याचा फडशा पाडला होता. या हल्ल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले होते. त्यानंतर रेस्क्यू फोर्स ला पाचारण करण्यात आले होते.आक्रमक झालेल्या वाघाला जेरबंद करण्यासाठी नागपूर, अमरावती, बुलढाणा येथील तीन रेस्क्यू टीम पिवरडोल येथे दाखल झाली होती. या टीमने वाघाला जेरबंद केले आहे. त्या वाघाला कुठे नेण्यात येणार हे स्पष्ट झाले नाही.