
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
उत्तरप्रदेशातील लखीमपूरला येथे शेतकरी विरोधी कायद्याला घेऊन सुरु असलेल्या आंदोलनस्थळावरील शेतकर्यांच्या आंदोलनात शिरुन केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राच्या वाहनाने आंदोलनातील शेतकरी चिरडले गेल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला.या घटनेत आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून यात एका पत्रकाराचाही समावेश आहे.या घटनेच्या निषेध नोंदवण्यासाठी व आंदोलक शेतकर्यांना भेटण्यासाठी जात असताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना सीतापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये बंदिस्त करण्यात आल्याने राळेगाव तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने त्या कृतीचा व घटनेचा निषेध नोंदवून कडक कारवाईच्या मागणीचे निवेदन महामहिम राष्ट्रपती उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फेत पाठवले.निवेदन देतेवेळी तालुका अध्यक्ष अरविंद फुटाणे,शहर अध्यक्ष प्रदीप ठुने, जिल्हा सरचिटणीस जानराव गिरी,अशोक काचोळे,गजानन पाल,मधुकर राजूरकर,प्रदीप लोहकरे,सुनील भामकर,कुंदन कांबळे,खुशाल रोहनकर,राजू पुडके, अफसर अली सैय्यद,हेमंत तागडे,निलेश हिवरकर,मंगेश राऊत,दिलीप दुधगिलकर,दिलीप कनांके,नरेंद्र जयसिंगकार,पांढुरंग बोभाटे, विनोद नरड,प्रफुल तायपडे, प्रभाकर दांडेकर,राहुल वाघने,लियाकत अली,बादशाह काझी,भानुदास राऊत,अक्षय भोयर,मनोज पेंदोर इत्यादी उपस्थित होते.
