राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून खऱ्या भारताचे दर्शन खेड्यांमध्ये असल्याचे महात्मा गांधीजींच्या विचाराला अनुसरुण आज वडकी येथे ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामुभाऊ भोयर(9529256225)

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा आपला पोशिंदा. . .आपल्या पोशिंद्याला ,आपल्या बळीराज्याला शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेताना सहजपणे सातबारा उपलब्ध व्हावा,करिता महसूल विभागाने *अमृत महोत्सव *साजरा करीत शेतकऱ्यांना मोफत सातबाराचे वाटप ग्रामपंचायत येथे करण्यात आले व वडकी उड्डाण पुलाखाली स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष तथा जि प सदस्य चित्तरंजनदादा कोल्हे, राळेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती प्रशांतभाऊ तायडे, जि प सदस्या प्रीतीताई संजयभाऊ काकडे, वडकी सरपंचा मोनिकाताई देठे, उपसरपंच शैलेशजी बेलेकर,पिपळापुर सरपंच रवीभाऊ चौधरी, संजयभाऊ काकडे, सागरभाऊ इंगोले, दिलीपभाऊ कडू, विशालभाऊ पंढरपुरे, शार्दूल जैस्वाल, मारुतीभाऊ धोटे’, पुंडलिकराव झोटींग, शरदराव उघडे, आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला ग्रामसेवक, तलाठी, पोलीस प्रशासन व ठाणेदार जाधव साहेब, वडकीतील व्यापारी यांनी आपली उपस्थिती दाखवली.