
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
तेलंगणा येथे राष्ट्रीय सब ज्युनियर मुलांच्या हँडबॉल स्पर्धेत दि. 7 ते 10 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे तेलंगणातील औरंगाबाद येथे सध्या या स्पर्धा सुरू आहे या स्पर्धसाठी राळेगाव चा हँडबॉल खेळाडू ऋतिकविजय आत्राम याची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. ऋतिक विजय आत्राम सोलापूर येथे आयोजित राज्य संघ निवड चाचणी मध्ये हँडबॉल खेळाचे उत्कृष्ट कामगिरी करत संघात स्थान मिळवले .
ऋतिक आत्राम न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव चा विद्यार्थी असून सर्व शिक्षकाने त्याचे कौतुक केले ,तसेच हँडबॉल प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक सागर जुमंनाके राष्ट्रीय खेळाडू हँडबॉल मार्गदर्शक सागर गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले आहे यांना आपल्या कामगिरीचे श्रेय ऋतिकने दिले हे विशेष व सर्व हँडबॉल चे सिनियर खेळाडूंनी शुभेच्छाचा वर्षाव केला .
