पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून ‘वसंत’ पुन्हा बहरणार

वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी बँकेने ना-हरकत द्यावी
🔸सहकार मंत्र्यांच्या सूचना

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

उमरखेड, महागाव, पुसद, हिमायतनगर, हदगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ‘वसंत सहकारी साखर कारखाना’ • अतिशय महत्वाचा असून येथील १५ ते २० हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या साखर कारखान्यामुळे सुगीचे दिवस यावे, यासाठी पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या पुढाकारातून वसंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी वेगाने हालचाली करण्यात येत आहेत. कारखाना सुरू करणे व अवसायनाची प्रक्रीया मागे घेणे या विषयावर निमंत्रक वसंत साखर कारखाना बचाव संघर्ष समिती उमरखेड यांनी पालकमंत्री यांना विनंती केली असता पालकमंत्री भुमरे यांचे निवेदनावर सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज मंत्रालयात सभा बोलावली होती. सहकार मंत्री यांचे अध्यक्षतेखाली आयोजित या सभेला पालकमंत्री संदीपान भुमरे, साखर आयुक्त पुणे, निमंत्रक वसंत साखर कारखाना बचाव संघर्ष समिती उमरखेड, कारखाना अवसायक तथा वसंत प्रादेशिक सहसंचालक (साखर) तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर आदि मान्यवर प्रत्यक्ष व व्हिडीओ कॉन्सफरन्सींग द्वारे सभेला उपस्थित होते.