
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव शहरात दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक १२ व प्रभाग क्रमांक ५ मध्ये रोडचे व नालीचे काम योग्य पद्धतीने सुरळीतपणे चालू असून हे होणारे बांधकाम थांबविण्यात येऊ नये याकरिता रिपाई आठवले गटाच्या वतीने दिं २० ऑक्टोबर २०२१ रोज मंगळवारला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
शहरात काही दिवसापासून प्रभाग क्रमांक १२ व प्रभाग क्रमांक ५ मध्ये दलीतवस्ती सुधार योजने अंतर्गत रोडचे व नाली चे काम सुरू असून वर्मा हार्डवेअर ते क्रांती चौक ही मार्केट लाईन असून या रस्त्यानी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते तसचे रोडची अवस्था खराब झाली असून वर्मा हार्डवेअर ते क्रांती चौक या रोडच्या बाजूने नाल्या अत्यंत महत्त्वाच्या असून या दोन्ही प्रभागातील होणारी कामे थांबवू नये अन्यथा हे काम थांबविल्यास दलितांवर एक प्रकारचा अन्याय होईल जर असे झाल्यास रिपाई आठवले गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी रिपाई तालुका अध्यक्ष गोवर्धनभाऊ वाघमारे.हिरामण आटे भोला धन कसार किशोर करपते सुनील वागदे संजय आटे सुधीरजी नगराळे, अनिलजी वागदे, उमेशजी अवसरमलस, बबनराव नगराळे, विनोदराव धन कसारा सुनीलजी बावणे जगन नगराळे बाबाराव नगराळे इंद्रजीत भगत सुनील शेंडे अतुल भगत राजू वाघमारे नाना अवाड कैलास अवसरमल शंकर नगराळे धर्मा माटे प्रकाश आमटे विनायक खडसे बाळू शेंडे कार्तिक खडसे नारायण शेंडे,अरुण कांबळे आदी उपस्थित होते.
