पोहणा येथे मुलीकडे आलेल्या ८३ वर्षीय वृद्धाची वर्धा नदित उडी घेऊन आत्महत्या

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

आज शनिवारी हिंगणघाट तालुक्यातील पोहणा येथे मुलीकडे आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा येथिल ८३ वर्षीय वृध्दाने वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.मृत्यक वृद्धांचे नाव पांडुरंग लक्ष्मण टाले वय 83 वर्ष राहणार मोहदा तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ असे आहे.त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्येचे पाहूल उचलेल्याचे सांगण्यात येते आहे.पांडुरंग लक्ष्मण टाले हे नेहमीच आजारी राहत होते ते आपल्या मुलीकडे पोहणा येथे आले होते.त्यांना दोन मुली एक मुलगा आहे. त्यांना पोटाचा खुप त्रास होत त्यामुळे ते नेहमी टेन्शन मध्ये राहाययचे वाढत्या आजरामुळे त्यांनी या आजाराला कंटाळून पोहना येथिल वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पांडुरंग टाले यांचा मुत्यदेह काही नागरिकांना पुलाच्या खाली नदिच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला याची माहिती वडनेर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुत्यदेह नदिबारे काढून पंचनामा करीत प्रेत शेवविच्छदाना पाठविले आहे.पुढील तपास वडनेर पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास उपनिरीक्षक राजू सोनपीतले, राहुल कलाने ,निखिल शेळके , कर्मचारी तपास करीत आहे