
. राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त १६ मे २०२२ रोज सोमवारला शहरातील महिलानी सकाळी ८:०० वाजता पासून आंबेडकर पुतळा येथे एकच गर्दी केली असून त्रिशरण पंचशील ग्रहण करून तथागताना अभिवादन केले .
त्यानंतर सायंकाळी ७:०० वाजता शहरातील बौद्ध उपासक-उपासिका यांनी पांढरे वस्त्र परिधान करून बुद्ध विहाराजवळ एकत्रित येऊन बुद्ध रथाची मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली असून शेवटी बुद्ध रथाच्या रॅलीची समाप्ती आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आली व बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थि होते.
