दुचाकी वाहन चालकांची बेशिस्त वाढली अल्पवयीन युवकाचे प्रमान मोठे

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

शहरात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात युवा अल्पवयीन दुचाकी वाहन चालक वाढल्याने यामध्ये रेसर दुचाकीस्वार कर्कश आवाजवाले वाहन परवाना नसलेले अल्पवयीन वाहन चालक दुचाकी क्रमांक नसलेले धावत असल्याने वाहतूक निमाचे तीन तेरा वाजले आहेत या प्रकाराकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून अशा बेधुंद वाहन चालवणाऱ्या स्टंटबाजावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील अनेक लहान मुले बेभान दुचाकी व चार चाकी वाहन चालवताना दिसून येतात या बेभान दुचाकी व चारचाकी वाहन चालकच्या बेशिस्तीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला त्यामुळे अपघातांची संख्या वाढलेली आहे शहरात दुचाकी परवाना नसलेले वाहन चालक मोठ्या प्रमाणात आहे नवका दुचाकी चालवायला शिकला कि त्याच्यामध्ये हिरोगिरी संचारत असते त्यामुळे रस्त्यावर स्टंटबाजी सुद्धा करत असतात ह्या स्टंटबाजी मुळे तरुण युवकाचे मृत्यू झालेले आहे त्यामुळे अशा बेशिस्त दुचाकी व चारचाकी वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पालक वर्गाचे ही मुलाकडे झाली दुर्लक्ष पालक आपला मुलगा आठव्या नवव्या वर्गात गेला की आपले स्वतःचे वाहन त्याला बिनधास्तपणे चालविण्यासाठी देत असतात त्याचे वय वाहन चालविण्याकरिता योग्य आहे का त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का हे काही बघितले जात नाही त्या करीत पालकांनी या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपली वाहने आपल्या मुलाजवळ दिली पाहिजे.