
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील चिखली (वनोजा)येथील स्मशानभूमी शेडचे बांधकाम हे जवळपास आठ दहा वर्षापासून झाले असले तरी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने उभारण्यात आलेले स्मशानभूमी शेड आजमितीस वापराविना पडले असून तहसीलदार साहेब ;गटविकास अधिकारी साहेब या स्मशानभूमीच्या रस्त्याकडे लक्ष तरी द्याहो अशी विनवणी चिखली येथील ग्रामस्थाकडून केली जात आहे.
या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून केवळ २०० मीटरचे अंतर असून या असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने गावातील नागरिकांना गावा भोवतालचा किंवा रोडच्या कडेला विधी करावा लागतो. या रस्त्याच्या संदर्भात ग्रामपंचायतीला तसेच लोकप्रतिनिधीला वारंवार सांगून सुद्धा या स्मशानभूमीच्या रस्त्याकडे कानाडोळा करीत असल्याचे नागरिकाकडून बोलल्या जात आहे तरी संबंधित विभागांनी या स्मशानभूमीच्या रस्त्याकडे लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. चिखली येथील गावाला स्मशानभूमीची ही जागा पूर्वीपासून असून ग्रामस्थांच्या मागणीवरून येथे स्मशानभूमी शेड उभारण्यात आले आहे हे शेड उभारून जवळपास तब्बल आठ ते दहा वर्षाचा कालावधी लोटला असून सुद्धा हे स्मशान भूमी रस्त्या अभावी वापराविना पडून आहे सद्यस्थितीत या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी केवळ २०० मिटर अंतर रस्त्याची आवश्यकता आहे परंतु स्मशानभूमीकडे जाण्यासाठी जागाच नसल्याने मयत न्यायची तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे पावसाळ्याच्या दिवसात परिणामी गावात एखादे मयत झाले तर रोडच्या कडेला किंवा गावा भोवताल असलेल्या खालील जागेत विधी केली जाते परंतु सतत पाऊस सुरू असला तर विधी उरकण्यात मोठा व्यत्यय निर्माण होते त्यामुळे या स्मशानभूमीच्या रस्त्या करिता तहसीलदार साहेब व गटविकास अधिकारी साहेब यांनी लक्ष देवून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी चिखली ग्रामस्थांकडून केली जात आहे.
