
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना ७४ गणवेशांचे वाटप सरपंच व सचिव यांच्या हस्ते करण्यात आले. सविस्तर वृत्त असे अजुनपर्यंत गनवेशांचे पैसे शाळेला प्राप्त झाले नसुन सुध्दा रिधोरा जि. प. शाळेचे मुख्याध्यापक आर. के. सुखदेवे यांनी पुढाकार घेऊन स्वथाच्या पैशाने ७४ गणवेश घेऊन शाळेतील मुला मुलींना वाटप केले आहे. सदर गनवेश वाटप करतेवेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजु गुरनुले, सरपंच उमेश गौऊळकार, दिपक पवार, सचिव विना राऊत,आर.के.सुखदेवे मुख्याध्यापक, शिक्षिका एच.एम.पांडे, अनिता राऊत, शिक्षक सचिन कुंभारे, उपस्थितीत होते सदर गणवेशांचा निधी शाळेला अजुनपर्यंत प्राप्त झाला नसुन सुध्दा शाळेच्या पहिल्याच दिवशी आर.के. सुखदेवे यांनी ७४ मुला मुलींना गणवेश वाटप केल्याने मुला मुलींच्या पालकांनी मुख्याध्यापककांचे आभार मानले आहे.
