
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगांव तालुक्यातील वलीनगर येथील विठ्ठल मनोहर राऊत वय १९ वर्ष हा गावालगतच्या विहिरीत पोहायला गेला अन जीव गमावून बसल्याची घटना आज दुपारी २ :०० वाजताच्या सुमारास घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की वलीनगर येथील गावालगत असलेल्या विहिरीत २ :०० वाजताच्या सुमारास गावातील काही मुले पोहायला गेले होते त्यानंतर विठ्ठल राऊत हा सुद्धा घरून पोहायला गेला असता विठ्ठल राऊत याने पोहण्यासाठी विहिरीत उड्डी घेतली व उड्डी घेतल्यानंतर विठ्ठल हा काही वेळ पाण्याच्या वरती आलाच नसल्याने ही माहिती पोहणाऱ्यानी घरच्यांना दिली तेव्हा घरच्यांनी व गावकऱ्यांनी विहिरीवर एकच गर्दी केली असता विठ्ठल हा पाण्याखाली होता याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस लगेच घटनास्थळी पोहचले त्यानंतर विठ्ठलचा मृतदेह विहिरी बाहेर काढून राळेगांव येथे ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम पाठविण्यात आला असून असून पुढील तपास ठाणेदार संजय चौबे यांचा मार्गदर्शनात जमादार अनंत इरपाते, व रत्नपाल मोहाड हे करीत आहे.
