राळेगाव तालुक्यातील छावा प्रतिष्ठान वरध तर्फे निशुल्क नेत्रतपासणी शिबिरात 300 लोकांना मोफत चष्मे वाटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील वरध येथील स्वर्गीय श्रीमती शांताबाई चंपतराव बातुलवार व स्वर्गीय रामचंद्र जी रागेनवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वरध येते छावा प्रतिष्ठान वरध यांच्या वतीने निशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आले या शिबिरात पाचशे रुग्णाचे तपासणी करण्यात आली त्यात तीनशे रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर 48 रुग्णाचे मोफत शस्त्रक्रिया डॉक्टर महात्मे हॉस्पिटल नागपूर येथे करण्यात आली या शिबिरात नागपूर येथे महात्मे हॉस्पिटल नागपूर येथील नेत्रतज्ञ डॉक्टर मंडळींनी रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिरात मान्यवरांनी भेटी दिल्या प्रा वसंतराव पुरके सर माजी शिक्षण मंत्री, प्रफुल भाऊ मानकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, अरविंद भाऊ वाढोणकर,अरविंद भाऊ फुटाणे, अंकुश भाऊ मुनेश्वर, प्रा चंद्रकांत भाऊ मांडवगडे,सर निलेश भाऊ रोठे, इत्यादी मान्यवरांनी या चशिबिराला भेटी दिल्या या शिबिराचे यशस्वीपणे आयोजन केल्याने आयोजक संजय भाऊ बातुलवार संचालक खरेदी विक्री संघ राळेगाव यांचे सर्वत्र यशस्वी आयोजनाने सर्वत्र कौतुक होत आहे ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश भाऊ रोठे, दीपक भाऊ अक्कलवार, विजयभाऊ राठोड, अरुण चिकराम, सागर मेश्राम, प्रदीप कुमरे, मारुती घाटंजी शुक्लदास, निमसरकर नाना पवार अनिल राठोड वैभव गजबे यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.