पशु वैद्यकीय दवाखान्याचा भोंगळ कारभार,उपचारासाठी अवाच्या सवा पैसे

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील वाढोना बाजार येथे पशु वैद्यकीय दवाखाना या ठिकाणी विस ते पंचवीस गावातील शेतकरी तसेच शेतमजूर हे आपले मुके जनावरे घेऊन उपचारासाठी येतात गेल्या कित्येक दिवसांपासून या पशु वैद्यकीय दवाखान्याला डाॅक्टरच नाही आहे या अभावी खाजगी डाॅक्टराकडून आपल्या जनावराचा अव्वा च्या संव्वा पैसे मोजुन थातुरमातुर उपचार करून घेतले जातात अशातच तालुक्यातील खडकी सुकळी येथील शेतकरी मधुकर सिडाम हे आपल्या शेळीला घेऊन वाढोना बाजार येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन आले दवाखान्यात आले असता दवाखान्यात मधुकर सिडाम हे डाॅक्टरांची वाट बघत होते डॉक्टर हजर नसल्याने त्यांच्या शेळीचा उपचाराअभावी म्रुत्यू झाला तरी जिल्ह्याधिकारी यवतमाळ यांनी लक्ष देऊन या ठिकाणी कायमस्वरूपी डाॅक्टर देण्यात यावे अशी परिसरातील शेतकरी यांची मागणी आहे.