प्रा. सुनील देशमुख हे आचार्य( डॉक्टरेट )पदवीने सन्मानित

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील पिंपरी (दुर्ग) येथील रहिवासी व भंडारा येथील जे.एम.पटेल महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक सुनिल शंकरराव देशमुख यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ द्वारा आचार्य( डॉक्टरेट) पदवीने सन्मानित करण्यात आले, विद्यापीठाच्या १०९ व्या दीक्षांत समारंभात त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली लव्ह अँड अर्बन लाईफ इन निस्सीम ई झेकिल्स पो यट्री असा त्यांचा शोधनिबंधात याविषयी होता तुमसर येथील गोपिका बाई भुरे महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ कनीज बानो कुरेशी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले होते इंग्रजी विषयातील डॉक्टरेट मिळणारे राळेगाव सारख्या ग्रामीण भागातील ते प्रथम प्राध्यापक होय अतिशय विपरित परिस्थितीतून त्यांनी शिक्षण पूर्ण करून ही पदवी प्राप्त केली ग्रामीण भागात शिक्षण पूर्ण करून डॉक्टरेट प्राप्त केल्याबद्दल त्यांचेवर सर्व स्तरातूनशुभेच्छांचा वर्षाव होत आहे.