
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील धानोरा गावातील किशोर गिरीधरराव गलाट यांचे शेत वनोजा शिवारात येत असुन शेत सर्वे नंबर 120/1 हे आहे हे शेत धानोरा व वनोजा रोड लगत असुन या शेतात चोरट्यांनी डल्ला मारला आहे . कापूस वेचण्यासाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्यामुळे आणि कापसाचे दर वाढल्यामुळे या संधीचा फायदा चोरटे घेत आहे. व तालुक्यात खेडा खरेदी असल्यामुळे या चोरट्यांना कापूस विकण्याकरिता सोपे जात आहे. अशा भुरट्या चोरट्या पासून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवश्यकता आहे.
