
. राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
भाजपा जिल्हा सरचिटणीस, माजी न. प. उपाध्यक्ष ऍड. प्रफुलसिंह चौहान यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून वैकुंठरथ|चे लोकार्पण आज (दी. 19) करण्यात आले. या वेळी आ. प्रा. डॉ. अशोक उईके, भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजनदादा कोल्हे, प. स. सभापती प्रशांत तायडे, भाजपा शहर अध्यक्ष डॉ. कुणाल भोयर,जिल्हा सचिव श्रीरंग चाफले, भुसे साहेब, न. प. मुख्याधिकारी अरुण मोकळ, ता. सरचीटणीस अभिजित कदम, बाळासाहेब दिघडे, बबनराव भोंगारे,निलय घिनमीने, विवेकभाऊ दौलतकार,अरुण शिवणकर, विशाल धनकसार, पवन दुबे, संदीप पवार, प्रवीण सेलोटे, सचिन
चौहान,सुधाकर गेडाम, सागर वर्मा, आकाश कुलसंगे, विनायक महाजन, संजय इंगळे, किरण भानखेडे, गोविंदराव डोंगरे, शुभम जयस्वाल आदी सह मान्यवर उपस्थित होते.
ऍड. प्रफुलसिंह चौहान मित्र परिवार,व यवतमाळ अर्बन बँक यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा वैकुंठरथ राळेगाव शहराला प्राप्त झाला. विविध सामाजिक उपक्रम वाढदिवशी राबविण्याची परंपरा या ही वर्षी ऍड. प्रफुलसिंह चौहान यांनी कायम राखली. या सोबतच वृक्षारोपण, फुटपाथ विक्रेत्यांना छत्री वाटप, ऑक्सिजन पोटली वाटप आदी समजयोगी उपक्रम देखील राबविण्यात आले.
या स्तुत्य उपक्रमाबाबत राळेगाव तालुक्यात समाधान व्यक्त होतं आहे.
