खेमकुंड येथे मनसे शाखा फलकाचे अनावरण व राळेगाव तालुक्यातील युवकांचा कल मनसे कडे


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचा फलक अनावरण सोहळा खेमकुंड येथे पार पडला.
मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवुन तालुक्यातील युवक मनसेमध्ये प्रवेश घेवुन नवनिर्माणाचा झेंडा हाती घेत आहेत. राळेगाव तालुक्यातील खेमकुंड येथे युवकांनी मनसेमध्ये प्रवेश घेवुन शाखा स्थापन केली आज खेमकुंड येथे *ग्राम दैवत हनुमान मंदिरात बजरंगबलीचे पुजन व मंदिर परिसरात वृक्षारोपण करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा फलकाचे अनावरण मनसे तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मनसे तालुका अध्यक्ष शैलेशभाऊ आडे, विठ्ठलभाऊ जोगी, सूरजराव लेनगुरे,संदीपजी गुरनुले, वृषभजी गुरनुले, (शाखा अध्यक्ष) (उपाध्यक्ष) गजाननराव बावणे,(सचिव) गजाननराव उईके,(कोषाध्यक्ष) स्वरूपजी मांदाडे,धिरजजी मांदाडे,अमितजी ठाकरे,अनिलजी मेश्राम, उमेशजी पावडे,मारोतीजी ठाकरे,पवनजी चांदेकर, गणेशजी नागोसे, उमेशजी बावणे ,अश्विनजी कुंभेकर ,अमरजी मेश्राम, गजाननजी भारसकरे,प्रतीकजी रोपाटे, निलेशजी गाडेकर,सचिनजी सोयाम,शंकरजी राऊत,अंकुशजी जूनगरे, उमेशजी मेश्राम, सुमितजी देवणारे, कृष्णाजी बोटरे, शंकरजी गुरनुले ,पांढुरंगजी उईके, प्रभाकरजी राऊत व अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.