
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
संघटनेच्या माध्यमातुन शासन दरबारी मानधन वाढीसाठी अनेकदा पाठपुरावा करुन सुध्दा कामाचा तान सहन करत अजुनही मानधन वाढणाच्या या अपेक्षत तालुक्यातील कोतवाल आहेत रिक्त असलेल्या कोतवालांच्या कामाचा ताणही असलेल्या कोतवालावर पडत असतो गावामध्ये दवंडी देणे शेतकरी व संबधीत विभागाच्या कर्मचा-यांना नोटीस देणे. शेतक-याकडील शेतसा-याची वसुली करणे.महसुल गोळा करणे. रेती घाटा विषयी माहिती संबधीत अधिकारी यांना देने .जमिन सर्वेक्षणासाठी रक्कम घेऊन पावत्या देने .पीक पाहणी अहवाल तयार करणे. शासनाची माहीती जनतेपर्यत पोहचविणे.मयताच्या वारसांची खरी माहीती प्रशासनाला देणे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे.सध्या अतिशय महत्वाचे ई पिक पाहनी.माझे शेत माझा सातबारा मिच नोंदविनार माझा पिकपेरा याची सगळी माहिती शेतकर्यांन पर्यत पोहचुन मोबाईल द्वारे समजुन सांगने .त्या नोंदीणीचे कामकाज पाहणे पावसाळ्याच्या दिवसात आपती व्यवस्थापन विभागात राञपाळीचे काम करणे . चौकीदार म्हणुन तहसील कार्यालयात काम करणे. अतिवृष्टीचा आढावा वरिष्ठांना देणे व निवडणुक विषयी सर्व कामे आदी कामांसाठी शासनातर्फे या कोतवालांना भता सुध्दा दिला जातो पण तो भत्ता म्हणजे या कोवालांची थट्टामस्करी असल्याचे मत सर्व स्तरातुन व्यक्त केल्या जात आहे राळेगाव तालुक्यात कोतवालांची एकूण ४१+३वाढीव पदे मंजुर असुन ३५ कोतवाल कार्यरत आहेत तर ९ पदे रिक्त आहेत शासनाने कोतवालांना चतुर्थ श्रेणीची शासनस्तरावर प्रक्रिया पुर्ण होई पर्यत कोतवालांना मासिक ७ हजार ५०० रुपया पेक्षा १५००० हजार द्यावे जेणेकरुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करता येईल महागाईच्या काळात चपलेसाठी मिळणारा १० रुपये भत्ता ही लाजीरवाणी बाब असुन हा भत्ता सुध्दा वाढवण्यात यावा .चतुर्थ श्रेणी व मानधन वाढीसाठी शासन दरबारी निवेदन दिली तसेच सातत्याने पाठपुरावा सुध्दा करत आहे . तालुका उपाध्यक्ष अध्यक्ष अंकितभाऊ पाटील| पंढरीजी सावरकर
