
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव येथे राळेगाव तालुका शिवसेना युवासेना वतीने दि 3 एप्रिल 2022 रोजी केंद्र सरकारच्या काळात होणाऱ्या पेट्रोल डिझेल सिलेंडर गॅस जीवनात जीवनावश्यक वस्तूच्या दरवाडीच्या विरोधात राळेगाव येथे टाळी थाळी वाजवून निषेध व्यक्त केला आहे .निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामोरे जायला नको म्हणून म्हणून निवडणूक निवडून आले आणि लगेच वाढवण्यास सुरुवात केली सध्या सीएनजी सीएनजी गॅस दरही वाढले असून 1 एप्रिल पासून औषधाचे दरही वाढणार आहेत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जनतेला महागाईच्या खाईत लोटत असून त्याबद्दल त्यांना काही वाटत नाही मोदी सरकारच्या या निर्णयाचे चटके देशातील जनता भोगत असून केंद्र सरकारला जागे करण्यासाठी 3 एप्रिल रोजी राळेगाव तालुका युवासेनेच्या वतीने महागाई मुक्त भारत या आशेने टाळी थाळी वाजवा आंदोलन करण्यात आली.
यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख विनोद काकडे युवा सेना तालुका प्रमुख अमोल राऊत शिवसेना उपतालुका प्रमुख प्रशांत वाडेकर युवा सेना तालुका प्रमुख वृषभ दरोडे युवासेना प्रमुख वैभव लोणार युवा सेना प्रभारी शहर प्रमुख निशिकांत पोंगडे,सौरभ गेडाम ,मंगेश उईके ,आकाश तोडासे ,राम घरद ,श्रीकांत ढोबळे ,मनोज राऊत ,किसन मडावी ,नंदु पोंगडे ,गणेश जमुंकार ,आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.
