
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
गोंडवाणा प्राण हितेचा पुत्र शहीद क्रांतीविर बाबूराव शेडमाके यांची १८९ वी जयंती दिं १२ मार्च २०२२ रोज शनिवारला शासकीय विश्राम गृहाच्या बाजूला बाबुराव शेडमाके यांची प्रतिमा असलेल्या परिसरात साजरी करण्यात आली.
यावेळी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रवींद्र शेराम, उपनगराध्यक्ष जानराव गिरी, महिला बालकल्याण सभापती कुंदन कांबळे,गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कार्याध्यक्ष बळवंत मडावी, अरविंद केराम ,आदी मान्यवरांच्या हस्ते वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले या कार्यक्रमा प्रसंगी अरविंद केराम यांनी बाबुराव शेडमाके यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला उपस्थित रंजीत पेंदोर,नंदलाल सोयाम,रामचंद्रजी मेश्राम,नानाजी कोवे, अंकुश कुमरे, सचीन मडावी, चंद्रभान कुमरे, रामाजी कुळसंगे,भानुदास आत्राम, गणेश कुडमथे,अरविंद केराम,रेखाताई केराम, कुमरे, मनोज कोवे, नानीबाई, केराम, बबनराव चिडाम,जानरावजी पेद्रांम, गजानन तुमराम, रंजीत परचाके,मधुकरजी पावले, मारोतराव उईके, वाल्मीकजी मेश्राम, मोरेश्वरजी सलाम, विरेंद्र सलाम, हनुमान कुमरे, संतोष मरसकोल्हे, संगीतराव मेश्राम, पुरूषोत्तमजी शेराम, अंकुश वड्डे,आदी होते.
