घराच्या गच्ची वरून पडुन शेतकरी इसमाचा मृत्यू

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर(9529256225)

     राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील शेतकरी संजय भैय्याजी गुरनुले वय ५२ वर्षे रा.रिधोरा याचा १९ एप्रिलच्या रोजी मध्ये रात्री घराच्या गच्ची वरूण पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे वडकी महावितरण कंपनीच्या लपन डावामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर यांचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी यांनी या वर्षी बऱ्यापैकी आपल्या शेतात उन्हाळी पीके लागवड केली आहे. परंतु सततच्या लोडशेडिंगमुळे शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणात अडचणीत येत असल्याचे दिसून येत आहे. तर ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर रात्री लाईट नसल्याने कुणी आपल्या घराच्या अंगणात तर कुणी घराच्या गच्चीवर रात्र काढण्याचा प्रयत्न करत आहेत तर अशातच संजय गुरनुले हा शेतकरी असुन दिवसभर काम करुण घरी आल्यानंतर नेहमी प्रमाणे जेवण करून आपल्या घराच्या गच्चीवर जावून झोपला तर त्याला लघवीला लागली म्हणून तो गच्ची वरून खाली उतरते वेळी त्याचा झोपेच्या डुलकीत तोल खाली गेला व वरुण खाली पडला तर त्याला ताबडतोब सेवाग्राम येथे उपचारासाठी नेण्यात आले होते परंतु डोक्याला जबर मार लागल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा आप्त परिवार असुन गुरनुले परिवारावर मोठा दुखः चा डोंगर कोसळला आहे सदर हा अपघात महावितरण कंपनीच्या लोडशेडिंगमुळे झाला असल्याचा येथील नागरिकांत बोलल्या जात आहे.लोडशेडिंग जर नसते तर हा शेतकरी कदाचित घराच्या गच्चीवर झोपायला गेला नसता.सदर ग्रामीण भागातील लोडशेडिंग सबंधित अधिकारी यांनी बंद करून ग्रामीण भागातील शेतकरी यांच्या उन्हाळी पीकाला जीवदान द्यावा व रात्रीच्या वेळी लाईट सुरळीतपणे चालू ठेवावी असे मत या परिसरातील नागरिक व्यक्त करतांना दिसत आहे.