
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
कळंब तालुक्यातील पाथ्रड शिवारात कात्री (रुईकर) गावासमोरील पुलाखाली गांजा भरुन असलेली स्विप्ट डिझायर कार क्रमांक टी एस ०८/ एच के ४६५२ भरधाव वेगात पुलाखाली उतरुन पट्टी झाल्याने कारचा चालक अब्दुल सुखीयान अब्दुल वकील वय २५ वर्ष रा.
सुफीया नगर अमरावती याचा मांडीजवळ पाय फॅक्चर होऊन गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १९ मे २०२२ चे रात्री १ वाजताचे दरम्यान घडली .
प्राप्त माहिती नुसार हैद्राबाद (तेलंगणा) येथून अमरावती जिल्ह्यात गांजाची मोठी तस्करी सुरू असुन नेहमी राळेगाव, कळंब मार्गे हायवे रोडने सुरु आहे. सदर मार्गाने नेहमी गांजाची तस्करी करीत असावा त्यामुळेच दि. १९ मे च्या रात्री कळंब तालुक्यातील पाथ्रड शिवारात कात्री गावाजवळ पुलाखाली कार पट्टी झाल्याने त्याचे पितळ उघडे पडले. अपघात होऊन गांजा भरुन असलेली कार पल्टी झाली व याच गांजाची तस्करी करणारा चालक गंभीर जखमी झाल्याने रात्रभर दिंगाबर अवस्थेत पडून राहिला सकाळी पुलाशेजारील शेतकरी व गुराखी शेतात गेले असता त्यांना पडुन दिसल्याने पोलीस स्टेशनला कळवून त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती केले त्यानंतर पोलीसांनी २ वाजता पासून कारचा पंचनामा व्हिडिओ शुटींग मध्ये सुरु केला तो रात्री पर्यंत कारवाई सुरुच होती यावेळी कारच्या डीक्की मधुन तीन प्लास्टीकच्या थैली मधुन २६ पाकीट बाहेर काढून गांजाचा वजनकाटा करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक अजित राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय चौथनकर, पीएसआय किशोर मावस्कर, पो. काॅ. ढबाले, राज वानखेडे, राजु ईरपाते, सचिन ठाकरे, एलसीबीचे पी एस आय भास्कर जमा. हरिश राऊत, पो. काॅ. महेश नाईक, उपस्थित होते.
