मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज बरडगाव येथे योग दिन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव द्वारा संचालित मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज बरडगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी योग साधना अत्यंत महत्त्वाची आहे म्हणुनच आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून योग साधनेचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे यात तालुका विधि सेवा समिती राळेगाव तथा तालुका वकील संघ राळेगाव यांनी सहभाग नोंदविला यात प्रमुख योग मार्गदर्शक म्हणून डॉ. भीमराव कोकरे सर यांनी योग साधनेचे धडे विद्यार्थ्यांना दिले. कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोकुलवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच संस्थेच्या संचालिका तथा प्राचार्या डॉ. शीतल बलेवार यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले तसेच योग साधनेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व शिक्षक वृंदानि प्रयत्न केले.