शेतकऱ्यांच्या विविध समस्ये बाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दिले निवेदन … ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव चे निवेदन…


राळेगांव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)


शेतकऱ्यांच्या विविध समस्ये बाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव चे अध्यक्ष जानराव गीरी यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन पीक विमा मागील वर्षी बोंडअळी,सड,मोठ्या प्रमाणात येऊन ही मिळाला नाही. हे क्षेत्र पीक विम्यातून वगळण्यात आले,तो सुध्दा मिळावा,
नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यां शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले,परंतु अद्याप ही एकाही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही,तसेच राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी दोन लाख रुपयांपर्यंत योजना राबिवली,बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली,परंतु दोन लाख रुपयांच्या वर रक्कम असणाऱ्या शेतकऱ्यांना वरची रक्कम भरण्यास तयार असताना,सुद्धा कोणतीही बॅंक कर्जमाफी देण्यास व नविन कर्ज देण्यास तयार नाही या सह अन्य समस्यांचे निवेदन देण्यात आले.
या वेळी उपाध्यक्ष सुरेश वर्मा,विनोद नरड,विजय केवटे, अशोक पिंपरे,दिनेश बोथरा ,गजानन पाल,सह शेतकरी बांधव उपस्थित होते…