आपादग्रस्त परिस्थिती मध्ये प्रशासनाची भूमिका सराहनिय?

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

अतिवृष्टी मुळे मागील आठवड्यात
राळेगांव तालुक्यात अतोनात नुकसान झालं आहे. या आपादग्रस्त परिस्थिती मध्ये प्रशासकीय यंत्रणा खूप “अलर्ट ” राहिल्याने नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
०९ जुलै ची रात्र तालुक्या साठी काळरात्र ठरली.अतिवृष्टी म्हणण्यापेक्षा ढगफूटी सारखा पाऊस पडल्यामुळे नदी,नाल्यांना मोठा पूर येऊन हे सर्व पाणी गावा गावात शिरलं आणि खूप मोठं नुकसान घरांची पडझड,गुरांचे कोठे पडले जीवनावश्यक साहित्य व कृषी साहित्य, रासायनिक खते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेतशिवारातील पीक उध्वस्त करुन गेले.
या बिकट परिस्थिती मध्ये प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी खरोखर च जीवाची पर्वा न करता नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. सुरक्षित ठीकाणी स्थलांतरीत करणं,लोकसहभागातून भोजनाची व कपडे व इतर सामुग्री देणं ही कामे जलद गतीने झाल्याने समाधान व्यक्त होत आहे हे विशेष.
जिल्हाधिकारी अमोल येडगे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्वतः पूरग्रस्त भागांचा धो धो पाऊसात दौरा करुन,सर्व यंत्रणा आपादग्रस्तांच्या मदतीला उभी केली.
उपविभागीय महसूल अधिकारी राळेगांव शैलेश काळे,तहसिलदार डाँक्टर रविंद्र कानडजे, सर्व नायब तहसिलदार,तलाठी बंधू, पोलिस स्टेशन राळेगांव चे पोलिस निरीक्षक संजय चौबे,वडकी पोलिस स्टेशन चे ठाणेदार विनायक जाधव व दोन्ही पोलिस स्टेशन चे सर्व कर्मचारी, पंचायत समिती राळेगांव चे गटविकास अधिकारी केशव पवार व इतर सर्व अधिकारी,ग्रामसेवक, तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी व सर्व कृषी सहाय्यक सह इतर शासकीय कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी केलेली दिवसरात्र मेहनत खरोखर च कौतुकास्पद व प्रशंसनिय आहे.
या सोबत च आजी माजी आमदारां नी दिलेल्या वेळोवेळी भेटी,सामाजिक कार्यकर्ते,मनसे तालुका अध्यक्ष शंकर वरघट व मनसे चे कार्यकर्ते,माजी सभापती प्रवीण कोकाटे,प्रशांत तायडे,सह इतर अनेक मान्यवरांनी आप आपल्या परीने पूरग्रस्तांच्या वेदना कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न खरोखर च प्रशंसनिय आणि कौतुकास्पद आहे. नुकसान भरपाई संदर्भात शेतशिवार व इतर नुकसानी चे पंचनामे सुरु असून तात्काळ भरपाई मिळावी याच प्रयत्नात प्रशासकीय यंत्रणा सध्या कार्यान्वित झाली आहे.