
राळेगांव तालुका प्रतिनिधी…
शहरात दिवसेंदिवस अवैध व्यवसाय वाढत चं आहे या साठी जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता जनसामान्यांचा प्रशासनास व सर्व राजकीय लोकप्रतिनिधीं ना आहे.
पोलिस स्टेशन राळेगांव च्या अक्षम्य दुर्लक्ष म्हणा की भरभरुन घरपोच मिळत असणारी “आर्थिक माया” या सह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुग गिळून बघ्याची भूमिका तर घेतली नाही ना? असाही मतप्रवाह व्यक्त होतोय. पाहूण्यांच्या हाताने साप मारला तर पाप ही लागत नाही आणि आपण नामनिराळे? अशीच संकल्पना सध्या राळेगांव शहरात दृढ होतेय.
अवैध देशी दारू विक्री,अवैध गुटखा विक्री,अवैध गोवंश तस्करी सह वाहतूक, वरली मटका प्रमुख काऊंटर पाच महिन्या पासून बंद पण तेवढीच बिदागी पदरात टाकणारी मोबाईल टाईप यंत्रणा शहरात पाच ठीकाणी बिनधास्त पणे सुरु चं आहे.
गावांगावांत अवैध देशी दारू विक्री सह अनेक रेती तस्करी पण अतिवृष्टीमुळे गौण उत्खनन बंद. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे?..सर्वाधिक आर्थिक लाभ अवैध गुटखा विक्री तून होत असल्याचे विक्री करणारे खुलेआमपणे बोंबाबोंब करत आहे?
राळेगांव तालुक्यात व शहरात काँग्रेस पक्षाची सर्वदूर सत्ता आहे.पण तेवढीच विद्यमान आमदार भाजपाची आणि त्यांच्या कार्यकर्ता मंडळींना ची. दोन्ही आर्थिक लाभार्थी तर झाले नाही ना?
अशीही चर्चा शहरात व तालुक्यात जोरशोर से सुरु आहे.
जी अत्यावश्यक काम पोलिस प्रशासनाने करावयास हवी ती विद्यमान पोलिस निरीक्षक राळेगांव च्या कारकिर्दीत झालीच नाही.
सुसाट चॅम्पियन्स बाईक स्वारांचा दिवसेंदिवस हैदोस मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यावर अंकुश नाही,शहरातील वाहतूक जागोजागी खोळंबते,या सह चोरी चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे या सोबत च बाईक चोरी,व्यापारी प्रतिष्ठान चे कुलूप तोडणे हे ही प्रमाण कमी झालं च नाही..
बदलत्या राजकीय अस्थिरते चा लाभ तर सबंधितं,म्हणजे संरक्षणा ज्यांची जबाबदारी आहे ते तर सर्व संबंधित राजकीय पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्ता मंडळी ना भाव देत नाही?
असाही मतप्रवाह चर्चेचा विषय आहे हे विशेष…ह
