
वीज वितरण कंपनीचा बेजबाबदार पणा कारणीभुत असल्याचा कुटुंबीयांचा आरोप!
राळेगाव प्रतिनिधी :रामभाऊ भोयर,राळेगाव
राळेगाव येथे काल सायंकाळी सहा वाजता प्रभाग क्रमांक दोन मधील गौरव कैलास कुडमते या सहा वर्षीय बालकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्याच्या या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.
तो आपल्या मित्रासोबत आपल्या घराजवळ विद्युत खांबाजवळ कांची खेळत होता. कांची खेळताना त्याचा विद्युत खांबाला हात लागल्याने तो जमिनीवर कोसळला, त्याला उपचारासाठी यवतमाळ येथे हलवीत असताना वाटेतचं त्याचा मृत्यू झाला गौरवचा मृत्यू विद्युत शॉक लागून झाल्याचा आरोप त्याचे आई-वडिलांनी व परिसरातील नागरिकांनी केला आहे. गौरव चे वडील कैलास कुडमते हे रोजंदारीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो गौरव कुडमते हा स्थानिक महावीर कॉन्व्हेंट चा के जी. 1 चा विद्यार्थी होता. आष्टा मार्गावरील या विद्युत खांबाला करंट असल्याचे अनेकांनी सांगितले, गत पंधरा दिवसापूर्वी या विद्युत खांबाला चिकटून हरीण देखील मरण पावल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला. फॉरेस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या हरणाला तेथेच दफन केले.दरम्यान काल सायंकाळी नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पोल वरील करंट कापल्याची माहिती परिसातील नागरिकांनी दिली गौरव च्या अचानक मृत्यूने परिसरातील लोक शोकाकुल असून कैलास कुडुमते यांचा गौरव हा एकुलता एक मुलगा होता. एकूणच वीज वितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केल्या जात आहे.
