स्टॅम्प पेपर विक्रेत्यांना स्टॅम्प पेपर उपलब्ध करून द्यावे सोबतच किमान एक सेतू सुविधा केंद्र व झेरॉक्सच्या दुकानाला परवानगी द्यावी :भा ज पा ,राळेगाव कडून मागणी

भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट


राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225

)
भारतीय जनता पार्टी तालुका राळेगाव च्या वतीने राळेगावचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तथा तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे यांची आज २२ मे रोजी दुपारी ११ वाजता भेट घेऊन त्यांना येत्या खरीप खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास स्टॅम्प पेपरच्या तुटवड्यामुळे विलंब होतो आहे करीता आपण स्टॅम्प पेपर विक्रेत्यांना स्टॅम्प पेपर उपलब्ध करून द्यावे सोबतच किमान एक सेतू सुविधा केंद्र व झेरॉक्सच्या दुकानाला परवानगी द्यावी या आशयाची आग्रही मागणी सदर भेटीदरम्यान करण्यात आली.
शेतकऱ्यांना सततच्या अडचणीचा सामना करावा लागतो नव्हे तर अनेक अडचणी त्यांच्या पाचवीला पुजलेल्या असताना राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटप करिता कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र स्टॅम पेपर वर सामूहिक क्षेत्र असल्यास संमती पत्र हे सुद्धा स्टॅम्पवर अनिवार्य केल्याने शेतकरी आजच्या घडीला स्टॅम्प पेपर साठी वनवन फिरत असून त्यांची अडचण लक्षात घेता काही स्टॅम्प विक्रेत्याकडून त्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सोबतच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास शेतकऱ्यांना पीक कर्जाची उचल करण्यास जून महिना उजाडेल यात तिळमात्र शंका नाही तेव्हा शेतकऱ्यांची हेळसांड होऊ नये याकरिता भाजपचे जिल्हा महामंत्री अॅड. प्रफुल चव्हाण यांचे नेतृत्वात भाजप पदाधिकारी अनिल राजूरकर श्रीरंग चाफले डॉक्टर कुणाल भोयर अभिजित कदम प्रकाश पाल प्रवीण शेलोटे संजय इंगळे निलेश घिनमिने विशाल धनकसार आकाश कुळसंगे इत्यादी कार्यकर्ते तहसील कार्यालयात पोचून उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्यासोबत चर्चा करून स्टॅम्प पेपर वर तोडगा काढण्याची मागणी केली.