डॉ. रवींद्र कानडजे तहसीलदार यांच्या पुढाकाराने रिधोरा गावचे तलाठी कार्यालय सुरू

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील रिधोरा गावचे तलाठी कार्यालय डॉ. रवींद्र कानडजे तहसीलदार राळेगाव,उमेश गौऊळकार सरपंच रिधोरा व गिरीश खडसे तलाठी यांच्या पुढाकाराने रिधोरा गावचे तलाठी कार्यालय झाले सुरू. सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यातील २७ तलाठी कार्यालय लाईट अभावी बंद असल्याची बातमी दैनिक देशोन्नतीने १६ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत डॉ. रवींद्र कानडजे,उमेश गौऊळकार सरपंच रिधोरा व गिरीश खडसे तलाठी रिधोरा यांनी पुढाकार घेऊन रिधोरा गावचे तलाठी कार्यालय सुरू केले आहे. डॉ. रवींद्र कानडजे तहसीलदार राळेगाव यांनी तालुक्यातील सर्व तलाठ्यांना असे निर्देश दिले की शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा ञास होवू नये म्हणून तातपुर्ती लाईट घेऊन वीज जोडून तलाठी कार्यालय सुरू करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहे. सदर लोकाभिमुख प्रशासन राहण्याच्या दृष्टिकोणातुन तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे यांनी अथांग प्रयत्न करून तलाठी यांना निर्देश देऊन सदर कार्यालय सुस्थितीत चालू करण्याचे आदेश तलाठ्यांना देण्यात आले आहे. या आदेशाचे पालन करत तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी आप आपल्या परिने आप आपल्या हलक्यातील तातपुर्ती लाईट घेऊन तलाठी कार्यालय सुरू करून शेतकऱ्यांना शेवा देणे सुरू केली आहे. परंतु रिधोरा व विहिरगाव येथील तलाठी कार्यालयाचे काम पूर्ण होवून तीन ते चार वर्षे लोटून गेले होते परंतु येथील तलाठी कार्यालय बंदच होते रिधोरा गावच्या तलाठी कार्यालयाचे चोरट्यांनी लाईट बोर्ड, लाईट, काचेची खिडकी, संडास सिट असे एक ना अनेक सामन चोरून नेले होते याबाबत दैनिक देशोन्नतीने १६ नोव्हेंबर रोजी तलाठी कार्यालय लाईट अभावी बंद व सामन गेले चोरीला असल्याची बातमी प्रकाशित केली होती. या बातमी दखल घेत डॉ. रवींद्र कानडजे तहसीलदार राळेगाव यांनी रिधोरा गावचे तलाठी गिरीश खडसे यांना निर्देश देऊन रिधोरा गावचे तलाठी कार्यालय तातपुर्ती लाईट घेऊन सुरू करायला सांगितले. तहसीलदार यांनी निर्देश देताच तलाठी गिरीश खडसे यांनी पुढाकार घेऊन रिधोरा गावचे सरपंच उमेश गौऊळकार यांच्या मदतीने तलाठी कार्यालय सुरू करण्यात आले. तलाठी कार्यालय सुरू होताच रिधोरा गावच्या शेतकऱ्यांना विनामूल्य सात बारा व आठ सरपंच, पोलीस पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. तलाठी कार्यालय सुरू केल्या बदल डॉ. रवींद्र कानडजे तहसीलदार राळेगाव, उमेश गौऊळकार सरपंच रिधोरा, तलाठी गिरीश खडसे रिधोरा याचे शेतकऱ्यांनी आभार मानले. यावेळी ढगेश्वर मांदाडे पोलीस पाटील व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

          प्रतिक्रिया

पी डब्ल्यू डी इलेक्ट्रिकल उप अभियंता यवतमाळ यांनी राळेगाव तालुक्यातील २७ तलाठी कार्यालयाचे वीज जोडणीचा प्रस्ताव अमरावती कार्यालय पाठविण्यात आला आहे. सदर वीज जोडणीची रक्कम प्राप्त होताच सर्व तलाठी कार्यालयामध्ये वीज जोडल्या जाईल.तातपुर्ती वीज जोडणी करून तलाठी कार्यालय सुरू करण्याचे निर्देश मी तलाठ्यांना दिले आहे.
डॉ. श्री.रवींद्रजी कानडजे तहसीलदार राळेगाव